scorecardresearch

छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त फलकबाजी प्रकरण ; खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकावले 

या प्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये फलक तयार करणाऱ्या व्यावसायिकाचाही समावेश होता.

छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त फलकबाजी प्रकरण ; खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकावले 
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मालाडमध्ये फलक लावणाऱ्या आरोपींविरोधात कुरार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या आरोपींनी बोरिवली येथील व्यावसायिकाला छोटा राजनचे हस्तक असल्याचे सांगून  खंडणीही मागितली होती. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त १४ आणि १५ जानेवारीला मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेजमधील तानाजी नगर भागातील गणेश मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी परिसरात फलक लावण्यात आले. त्यावर छोटा राजनचा ‘आधारस्तंभ’ असा उल्लेख करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मालाडमध्ये हे फलक लागताच ते सर्वत्र प्रसारित झाले.  संबंधितांवर  पोलिसांनी कारवाई केली.  या प्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये फलक तयार करणाऱ्या व्यावसायिकाचाही समावेश होता. प्रकरणातील आरोपी राज सदाशिव गोळे, सागर ज्ञानेश्वर गोळ आदींविरोधात आता खंडणीचाही गुन्हा दाखल  केला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजन याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. याबाबत टिळकनगर पोलिसांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नवी मुंबईचे संपर्क प्रमुख नीलेश (आप्पा) पराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्यांना अटक केली. पराडकर यांनी छोटा राजन याचे छायाचित्र असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. ही छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला.  

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 02:46 IST

संबंधित बातम्या