धारावीत ठाकरे व शिंदे गटात शिवीगाळ झाल्याचा प्रकार ताजा असताना आता तेथील शिंदे गटाविरोधात लावण्यात आलेला आक्षेपार्ह फलक पोलिसांनी काढून घेतला. या फलकामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तो हटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- तयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश 

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांची कारवाई

धारावी परिसरातील एका नवरात्र उत्सव मंडळाने फलक लावला होता. मुले पळवणारी टोळी ऐकली आहे, पण बाप पळवणारी टोळी पहिल्यांचा बघतोय, असा मजकूर त्यावर होता. या फलकामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून संबंधीत फलक काढण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला.

हेही वाचा- धारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर?; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक

धारावीत नेमकं काय घडलं

धारावी मील कंपाऊंड येथे मॉर्निंग स्टार शाळा येथे सरवणकर गटाची गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुन्हा वाद झाला झाला. दरम्यान, सदा सरवणकर यांची बैठक संपल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केल्याचा दावा सरवणकरांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शिवसैनिकांना शांत केले गेले. त्यानंतर धारावी पोलिसांनी याप्रकरणी राजेश सुर्यवंशी, मुथू पठाण, चेतन सुर्यंवशी यांच्यासह इतर चार ते पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविध कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर प्रभादेवीनंतर धारावी येथील राजकीय वातावरण तापले असून पोलीस सतर्क झाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police taken action on the navratri group that put up banners against the shinde group in dharavi mumbai print news dpj
First published on: 26-09-2022 at 11:19 IST