धार्मिक क्षेत्राशी संबंधितांकडून राजकारण नको!

हिंदुत्व आणि धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे.

महापौरांनी साध्वी कांचन गिरी यांना सुनावले

मुंबई : धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी राजकारण करू नये, शिवसेनाप्रमुखांच्या मुलाबाबत कोणीही महाराष्ट्रात येऊन काही म्हणणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचन गिरी यांना सुनावले. येथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना मारहाण के ली होती तेव्हा या कांचन गिरी कुठे होत्या, असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला.

कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण केले. राज ठाकरे यांनीही अयोध्येला येणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले आहे. या भेटीनंतर कांचन गिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या टीकेला महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा कांचन गिरी कुठे होत्या? यांना कोणालाही प्रमाणपत्र देण्याचा अधिकार काय, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे.

हिंदुत्व आणि धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे. घरात धर्म पाळा आणि घराबाहेर आल्यानंतर राष्ट्रीयत्वाचे पालन करणे म्हणजेच हिंदुत्व आहे, हिंदुत्व हे मिरवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. त्याला सोयीनुसार वापरू नका, असे आवाहन महापौरांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Politics from those associated with the religious field mayor sadhvi kanchan giri akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या