रेमडेसिविरवरून राजकारण

रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकामी कु पीत पॅरासिटामॉल गोळ्यांचे पाणी भरून ते  सीलबंद केले जात होते.

रेमडेसिविरच्या पुरवठय़ावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शनिवारी कलगीतुरा रंगल्याच्या पार्श्वभूमी वर रविवारी वादाचा दुसरा अंक रंगला. रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एका औषध कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले असताना रेमडेसिविरच्या कुपीत पाणी भरून इंजेक्शन म्हणून विक्री केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चौघांना अटक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. 

  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चौघांना बारामतीमध्ये अटक
  • रेमडेसिविरच्या कुपीत पाणी भरून विक्री

मुंबई/पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकु टीस आले असताना बारामतीमध्ये इंजेक्शनच्या कुपीत पॅरासिटामॉल गोळ्यांचे पाणी भरून त्याची विक्री करताना चौघांना अटक करण्यात आली. त्यातील एकजण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकामी कु पीत पॅरासिटामॉल गोळ्यांचे पाणी भरून ते  सीलबंद केले जात होते. काळ्याबाजारात या इंजेक्शनची ३० ते ३५ हजार रुपयांत विक्री केली जात होती. इंजेक्शनचा वापर झाल्यावर त्याच्या रिकाम्या कुप्या रुग्णालयातील एक कर्मचारी बनावट विक्री करणाऱ्या टोळीकडे देत असे. बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला या इंजेक्शनची आवश्यकता होती. त्याने या टोळीतील एकाशी संपर्र्क साधला असता ३५ हजार रुपयांमध्ये हे इंजेक्शन देण्याचे त्याने मान्य के ले. पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या जबाबातून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पाहणी के ली असता इंजेक्शनचे आवरण नीट नव्हते. या टोळीने पाचपेक्षा अधिक बनावट व पाणी भरून इंजेक्शनची विक्री केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बनावट इंजेक्शन विक्रीप्रकरणी  पोलिसांनी दिलीप गायकवाड, शंकर भिसे, संदीप संजय गायकवाड आणि प्रशांत घरत या चौघांना अटक के ली. यापैकी दिलीप गायकवाड हा बारामतीमधील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. समाजमाध्यमांमध्ये राष्ट्रवादीच्या शिर्षस्थ नेत्यांबरोबरची त्याची छायाचित्रे प्रसारित झाली होती.

शासकीय कामकाजात हस्तक्षेपच – गृहमंत्री

रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी औषध कं पनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलाविले होते. पोलिसांवर दबाव टाकणे हा शासकीय कामकाजात हस्तक्षेपच समजला जातो. यामुळे फडणवीस व दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा का, याची चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला गुजरातमध्ये अटक

रेमडेसिविर  इंजेक्शनच्या १८ कुप्यांचा काळाबाजार करताना ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला व त्याच्या सहकाऱ्याला तीन दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ब्रुक फार्मा कंपनीचे तांत्रिक संचालक मनीष सिंह व त्यांचा साथीदार दमण येथील रहिवासी वरुण कुंद्रा यांना वलसाड पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना मुद्देमालासह १५ एप्रिलला अटक केली. त्याबाबतचे तपशीलवार वृत्त ही पोलिसांच्या हवाल्याने १६ एप्रिलला गुजरातमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Politics in remdesivir injection shiv sena congress bjp ncp akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या