Porn Films case : अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलीस आज करणार चौकशी

राज कुंद्रावर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री शर्लिन चोप्राला पोलिसांनी समन्स बजावलं आहे.

sherlyn chopra instagram account, sherlyn chopra porn films case, sherlyn chopra latest news
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपती राज कुंद्रा याला अटक केली असून, आता अभिनेत्री शर्लिन चोप्राला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं आहे. (छायाचित्र। शर्लिन चोप्रा इन्स्टाग्राम)

काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणाचे धागेदोरे प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपती राज कुंद्रा याला अटक केली असून, आता अभिनेत्री शर्लिन चोप्राला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं आहे. तिची आज मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून चौकशी केली जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने मालाड पश्चिम भागात असलेल्या मढ गावातील एका बंगल्यावर कारवाई केली होती. पॉर्न चित्रपटांचं चित्रीकरण केलं जात असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी जुलै २०२१ च्या अखेरीस उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर आणखी काही जणांना या प्रकरणात अटक केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स बजावण्यात आलेलं आहे. शर्लिन चोप्राला या प्रकरणात सहआरोपी केलं जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, अटकेच्या भीतीने शर्लिन चोप्राने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने शर्लिनची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता प्रॉपर्टी सेलकडून शर्लिन चोप्राला समन्स बजावण्यात आलं असून, आज (६ ऑगस्ट) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

राज कुंद्राला अटक केल्यापासून पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंध असलेल्या संशयितांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, समन्स बजावण्यात आलेल्या अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर गंभीर आरोप केलेला आहे. “२०१९मध्ये राज कुंद्रा आपल्या घरी आला होता आणि त्याने जबरदस्ती संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. राज कुंद्राने जबरदस्ती किस केलं होतं”, असंही शर्लिनने यापूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Porn films case raj kundra arrest mumbai police has summoned actress sherlyn chopra bmh

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी