scorecardresearch

धक्कादायक! मुंबईमधील कॉलेजचा ऑनलाइन क्लास सुरु असतानाच लागला पॉर्न व्हिडीओ

पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्यामुळे कॉलेजला अचानक हा ऑनलाइन क्लास थांबवावा लागला

धक्कादायक! मुंबईमधील कॉलेजचा ऑनलाइन क्लास सुरु असतानाच लागला पॉर्न व्हिडीओ
पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्यामुळे कॉलेजला अचानक हा ऑनलाइन क्लास थांबवावा लागला (File Photo: PTI)

मुंबईतील एका कॉलेजचा ऑनलाइन क्लास सुरु असतानाच अचानक स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्यामुळे अचानक हा ऑनलाइन क्लास थांबवावा लागला. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला आहे. या ऑनलाइन क्लासमध्ये विद्यार्थी, कॉलेजमधील शिक्षक असे एकूण ६५ जण उपस्थित होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विलेपार्ले येथील या कॉलेजने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीने लिंक हॅक करुन आक्षेपार्हे व्हिडीओ लावल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आयपी अॅड्रेसच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न आहेत.

“ऑनलाइनल क्लास सुरु असताना आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणाऱ्याचा सायबर सेल शोध घेत आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शशिकांत माने यांनी दिली आहे.

१५ दिवसांपूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये १५ वर्षाच्या मुलाला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आलं. या अल्पवयीन मुलाने कोडिंग क्लासमध्ये प्रवेश करत महिला शिक्षकांसमोर आक्षेपार्ह कृत्य केलं होतं. १५ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान त्याने हा प्रकार केला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या