राज कुंद्राला दिलासा

नोव्हेंबर २०२०च्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी कुं द्राने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई : अश्लील चित्रपटनिर्मिती प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात व्यावसायिक राज कुंद्राला पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिले. अशाच प्रकारच्या अन्य प्रकरणात कुं द्रा सध्या अटके त आहे.

नोव्हेंबर २०२०च्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी कुं द्राने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी कुंद्रा याच्या याचिकेवर पोलिसांना २५ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच तोपर्यंत या गुन्ह्यात कुं द्राला अटक न करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कुंद्राने गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे आपल्यालाही जामीन मंजूर करण्याची मागणी कुंद्राने केली आहे.

परंतु या प्रकरणातील त्याची भूमिका अन्य आरोपींपेक्षा वेगळी असल्याचा दावा करत पोलिसांनी त्याच्या याचिकेला बुधवारच्या सुनावणीत विरोध केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pornography filmmaker raj kundra police high court akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या