मुंबई : करिअरचा प्रश्न कायमच अवघड होता, पण करोनाकाळाने तो आणखी कठीण बनवला. त्यामुळेच विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा अर्थात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. येत्या २७, २८ मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होणार आहे. बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या विषयांना अधिक वाव आहे, कोणती क्षेत्रे प्रगतीची ठरतील, अशा अनेक विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांना थेट तज्ज्ञांकडून शंकानिरसन करून घेता येईल. या करिअर कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्गदर्शक कोण?

ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, विवेक वेलणकर यांच्यासोबतच मानसोपचारतज्ज्ञ

डॉ. हरीश शेट्टी आणि डॉ. राजेंद्र बर्वे, सायबर कायदे तज्ज्ञ युवराज नरवणकर, ‘भाडिपा’चा सारंग साठय़े, बायोटेक्नॉलॉजीविषयक तज्ज्ञ प्रा. सिद्धिविनायक बर्वे आदी तज्ज्ञ या करिअर कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि मार्गदर्शन करतील.

मुख्य प्रायोजक :

  • गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट , मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक :

  • विद्यालंकार क्लासेस
  • आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स

पॉवर्ड बाय :

  • ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी
  • व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल
  • क्लासरूम एज्युटेक
  • सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक..

http://tiny.cc/MargYashacha_27May   

http://tiny.cc/MargYashacha_28May

कधी? : २७ आणि २८ मे

कुठे? : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post twelfth career directions student parents guidance ysh
First published on: 19-05-2022 at 00:53 IST