पदोन्नतीबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयास स्थगिती

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वांसाठी खुला करण्याच्या  राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. १० जूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश न्यायालयाने  दिले.

राज्य शासकीय-निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीतील आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द के ल्यानंतर, त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील के ले आहे. न्यायालयात हे प्रकरण असतानाच राज्य शासनाने ७ मे रोजी पदोन्नतीतील ३३ टक्के  आरक्षण रद्द करुन, पदोन्नतीचा कोटा सर्वांसाठी खुला करण्याचा आदेश जारी के ला.

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी रिक्त जागा भरण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहूनच ही पदोन्नती देण्यात आल्याची सरकारच्या वतीने अ‍ॅड्. प्रतिभा गवाणे यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर याचिकांवरील सुनावणी १० जूनपर्यंत स्थगित करून तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

सरकारविरोधात राज्यभर आंदोलने

मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा ७ मेचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विविध आंबेडकरवादी संघटना तसेच मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Postponement of state government decision regarding promotion akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख