शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी “मी या भानगडीत पडत नाही” असं मत व्यक्त केलं. यावर आता युतीची घोषणा केल्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंसमोर प्रत्युत्तर दिलं. ते सोमवारी (२३ जानेवारी) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली आहे. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं आहे. हे शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी आशा मी बाळगतो. कारण या लढ्याकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो.”

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो. आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केलं. नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतलं आणि विचारलं की, तुम्ही काय केलं? त्यावर आम्ही सभागृह बंद केलं, त्यानंतर तुम्ही पुढे काय केलं असं सांगण्याची मागणी केली.”

“केवळ नेतृत्वाचं प्रतिमाहनन करणं सुरू आहे”

“नरसिंहरावांनी संध्याकाळी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितलं की, तुम्ही असंच केलं तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल. आज दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार सुरू आहे. एखाद्या नेत्याने खरंच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका. मात्र, न्यायालयात न्यायचं नाही, तुरुंगात टाकायचं नाही, केवळ नेतृत्वाचं प्रतिमाहनन करायचं,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

हेही वाचा : “मी या भानगडीत पडत नाही,” या शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरेंसमोर प्रत्युत्तर, म्हणाले…

“एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे”

“कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे,” असंही वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरे- वंचितच्या युतीवर ओवैसी यांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा त्यांचा निर्णय…”

शरद पवार काय म्हणाले होते?

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही.”