वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीच तास या दोघांमध्ये खलबतं सुरू होती, अशी माहिती आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानानंतर शिंदे गटाचे संजय गायकवाड आक्रमक, म्हणाले “कोणी मुर्खासारखे…”

What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
Eknath Shinde Chandrasekhar Bawankule meeting in Koradit discussion on political issues
कोराडीत शिंदे-बावनकुळे भेट, राजकीय मुद्यावर चर्चा

वर्षा निवासस्थानी पार पडली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबात स्पष्टता नसली, तरी या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर शिंदे गटाबरोबर जाणार का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

हेही वाचा – शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख वादातून कायम चर्चेत

वंचित-शिंदे गटाकडून भेटीबाबत दुजोरा

दरम्यान, या भेटीबाबत वंजिच बहुजन आघाडी आणि शिंदे गटातून दुजोरा देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली भेटी ही इंदू मिल संदर्भात होती. याचे कोणतेही राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिली आहे. तसेच या बैठकीला गुप्त बैठक म्हणता येणार नाही कारण ही वर्षा बंगल्यावर झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. तसेच सर्व पक्षांना घेऊन महाराष्ट्राचा विकास करावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे, असेही ते म्हणाले.