scorecardresearch

अभिनेता प्राण रुग्णालयात

हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाला एक वेगळी ओळख देणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार होत असल्याचे लिलावती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. सुधीर डगावकर यांनी सांगितले.

‘हलाकू’, ‘हाफ तिकीट’, ‘डॉन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या प्राण यांची तब्बेत काही दिवसांपासून बिघडली होती. शुक्रवारी ते लिलावती रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. मात्र या तपासणीच्या वेळी त्यांच्या श्वसनयंत्रणेत काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. मात्र सध्या त्यांची तब्बेत ठीक असून ते अजूनही रुग्णालयातच आहेत, अशी माहिती डॉ. डगावकर यांनी दिली.
तब्बल ३५० हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्राण यांना २००१मध्ये सरकारने चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2012 at 06:56 IST

संबंधित बातम्या