उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून कुंभमेळा भरविला जाणार असून या महामेळाव्यात १२ कोटी भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना गुरुवारी यांनी कुंभमेळ्याची माहिती दिली. कुंभमेळाव्यातील चार मेळाव्यांपैकी प्रयागराज (अलाहाबाद) येथील कुंभमेळा महत्त्वाचा मानला जातो. दररोज २० लाख भाविक मेळाव्याला हजेरी लावतीत तर मौनी अमावस्येच्या दिवशी ३ कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
uttar pradesh cm yogi adityanath marathi news
“सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

कुंभसाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

देशातील प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी ३० प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत.  या मेळाव्यानिमित्त २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी विविध प्रदर्शने, कला दालन आदींचा समावेश आहे. देखाव्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.