मुंबई : लाखो-करोडो रुपयांचे वाहन खरेदी केल्यानंतर, त्या वाहनाला आकर्षक, पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे वाहन मालिका खुली झाल्यानंतर, ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांक खरेदीसाठी लिलाव होतात. मात्र, नुकताच राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना अधिक रक्कम मोजून पसंतीच्या वाहन क्रमांकाची नोंदणी करावी लागणार आहे. ०००१ हा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी आता १ लाख ते ६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडच्या काळात पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी करून अनोखी वाहन क्रमांक पाटी वाहनाला लावण्याचे वेगळा कल सुरू झाला आहे. व्यावसायिक, उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी, सेलिब्रिटी आणि काही हौशी मंडळीद्वारे त्यांच्या अत्याधुनिक आणि आरामदायक वाहनांसाठी ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांकांना प्राधान्य देतात. सर्वाधिक मागणी आणि सर्वाधिक महागडा वाहन क्रमांक ‘०००१’ आहे. या वाहन क्रमांकाचे शुल्क ३ लाख रुपये होते. आता नुकताच जारी झालेल्या राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, ‘०००१’ क्रमांकाची किंमत चारचाकी वाहनांसाठी ५ लाख रुपये होईल. याच क्रमांकासाठी दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्रमांकासाठी ५० हजार रुपयांपर्यंत आकारले जात होते. या रकमेत दुप्पट करून ही रक्कम १ लाख रुपये केली आहे. तर, मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांत जास्त मागणी असलेल्या भागात ‘०००१’ क्रमांकाची किमत चारचाकी वाहनांसाठी ४ लाखांवरून ६ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे.

हेही वाचा – मुंबई : …अखेर जोग पुलाची दुरुस्ती होणार, उड्डाणपुलाचा ९५ कोटींचा खर्च पालिका करणार, एमएमआरडीएकडून पैसे वसूल करणार

नवीन दर खासगी आणि व्यावसायिक वाहनांना लागू झाले आहेत. दुचाकी, तीनचाकी आणि इतर वाहन श्रेणींसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जातील. तसेच एकदा राखून ठेवलेला वाहन नोंदणी क्रमांक वाटप केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत फक्त कुटुंबातील सदस्यांकडे हस्तांतरित केला जाऊ शकेल.

शुल्क वाढीमुळे परिवहन विभागाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे. १ जानेवारी २०२४ ते २८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत २ लाख १० हजार २८० पसंतीचे वाहन क्रमांक खरेदी केले आहेत. यातून परिवहन विभागाला १८६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

हेही वाचा – एसटीच्या ताफ्यात फक्त ६५ विद्युत बस, दर महिना २१५ बस ताफ्यात दाखल करण्याचा झाला होता करार

पसंतीच्या वाहन क्रमांकाची किमत ५ हजारांपासून ते ६ लाखांपर्यंत आहे. १६ पसंतीच्या चारचाकी वाहन क्रमांकाचे नवे शुल्क १ लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर, ४९ पसंतीच्या चारचाकी वाहन क्रमांकांचे शुल्क ५० हजारांवरून ७० हजार केले आहे. तर, १८९ पसंतीच्या वाहन क्रमाकांची रक्कम २५ हजारांपर्यंत आहे.