मुंबई: मतदार यादीतील चुकीची नावे, अपूर्ण आणि चुकीचे पत्ते यामुळे मतदानाच्या टक्केवारीत होणारी घट दूर करण्यासाठी आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी अचूक मतदार याद्या तयार करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी हे आदेश दिले. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ८ डिसेंबपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या ‘सेक्शन अ‍ॅड्रेस’मध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरुस्त करावा. शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा. विशेषत: नवीन इमारतींबाबत जास्त गोंधळ आढळून येतो. तो टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन नवीन भाग यादी संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी यांनी यादी भागात पत्त्यानुसार भाग तयार करून त्या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची नावे नोंदविले जातील, याची दक्षता घ्यावी. मतदार राहतो, त्याच्या वेगळय़ाच ठिकाणी त्याचे मतदार यादीत नाव नोंदणी होणे किंवा चुकीचा पत्ता याबाबत शहरी भागातून मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येतात. त्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी यात स्वत: लक्ष घालावे अशा सूचना कुरुंदकर यांनी केल्या.

Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’
Vanchit, Ramtek
वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!