मुंबई: महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांच्या नियुक्तीनंतर संघटनेच्या समितीची घोषणा बुधवारी करण्यात आली. नव्या रचनेत संघटनेत पहिल्यांदाच प्रमुख संघटक पद निर्माण करण्यात आले असून १२ जणांच्या या नियुक्त्या एक वर्षांसाठी करण्यात आल्या आहेत.  मनविसेचे माजी अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपविली होती.  यात प्रमुख संघटक म्हणून सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी, माजी आमदार नितीन सरदेसाई यांचे चिरंजीव यश सरदेसाई, संतोष गांगुर्डे, चेतन पेडणेकर आणि प्रशांत कनोजिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी  गजानन काळे, सायली सोनावणे, संदीप पाचंगे, राजीव जावळीकर आणि अखिल चित्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी आशीष साबळे पाटील आणि अक्षय काशीद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President maharashtra navnirman vidyarthi sena amit thackeray appointment organization committee ysh
First published on: 19-05-2022 at 00:02 IST