Preventive action against 47 people related to PFI in the state ysh 95 | Loksatta

पीएफआयशी संबंधित ४७ जणांवर राज्यात प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या महाराष्ट्रातील सरचिटणीसासह ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पीएफआयशी संबंधित ४७ जणांवर राज्यात प्रतिबंधात्मक कारवाई
पीएफआय (संग्रहित फोटो)

मुंबई: राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या महाराष्ट्रातील सरचिटणीसासह ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईतही पवई पोलिसांनी पीएफआय एका पदाधिकाऱ्याला प्रतिबंधात्मक अटक केली. पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असलेल्या कारवाईविरोधात तो ट्वीट करत असल्याचा आरोप आहे. तसेच सरकारविरोधी व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्टही त्याने रिट्वीट केल्याचा आरोप आहे. पीएफआयशी संबंधित कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना राज्य पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी, मालेगाव, अमरावती अशा विविध ठिकाणी ४७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय काही व्यक्तींकडून गैरप्रकार न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. काही जणांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  मुंबईतही मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत पीएफआयच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २२ सप्टेंबरला पीएफआयविरोधात देशभर केलेल्या कारवाईविरोधात संघटनेचे सदस्य समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या  आधारे पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई आयआयटी मुख्य द्वारासमोरील हनुमान रोड परिसरात राहणारा पीएफआयचा महाराष्ट्र सरचिटणीस सईद अहमद सरदार अहमद खान याला अटक केली. खान हा  राज्य सरचिटणीस, तसेच वित्त विभागाचा प्रभारीही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

संबंधित बातम्या

मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
गतिमंद बलात्कारपीडितेला ३५ व्या आठवड्यांत गर्भपातास मनाई; आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाने परवानगी नाकारली
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘मविआ’चा १७ डिसेंबरला महामोर्चा; राज्यपाल, सीमाप्रश्नाबाबत आक्रमक भूमिका
सर्व शहरांचे सौंदर्यीकरण; राज्य शासनाचा निर्णय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुझं असणं मला…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची पहिली पोस्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे
“पंढरपूरमधील विठोबाही…”; कर्नाटकचा उल्लेख करत शिंदे-भाजपा सरकारच्या धोरणांबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
“दादा तुम्हाला कुठून माईक खेचायला…”, पत्रकार परिषदेला पोहोचताच उद्धव ठाकरेंची अजित पवारांना विचारणा, जयंत पाटीलही लागले हसू
ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘पिचर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित