बेळगावमध्ये केलेल्या भाषणाबद्दल राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ाबद्दल सर्व विरोधी सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत कर्नाटक सरकारचा सोमवारी विधानसभेत निषेध केला. हा गुन्हा मागे घ्यावा म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या समारंभात केलेल्या प्रक्षोभक भाषणाबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला .
‘गृहमंत्र्यांविरोधातील गुन्हा मागे घेण्याची विनंती करणार’
बेळगावमध्ये केलेल्या भाषणाबद्दल राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्य़ाबद्दल सर्व विरोधी सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत कर्नाटक सरकारचा सोमवारी विधानसभेत निषेध केला.
First published on: 16-04-2013 at 05:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan to urge karnataka govt to drop fir against rr patil