scorecardresearch

Premium

मुंबई विमानतळावर दुर्घटना, धावपट्टीवरून विमान घसरल्याने लागली आग; अपघाताचा VIDEO आला समोर

व्हीएसआर एव्हिएशन ही नवी दिल्लीस्थित कंपनी आहे. ही कपंनी कॉर्पोरेट प्रवासी आणि इतरांना सुरक्षित आणि परवडणारे विमान प्रवासाची सुविधा पुरवते.

Mumbai Airport accident
मुंबई विमानतळावरची घटना (फोटो -सोशल मीडिया व्हायरल फोटो)

मुंबई विमानतळावर आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. Bombardier Learjet हे खाजगी विमान धावपट्टीवरून घसरले आहे. आज सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी हा अपघात झाला. या खासगी विमानात आठ जण होत. धक्कादायक म्हणजे, विमान घसरल्यानंतर विमानाला आगही लागली होती.

विशाखापट्टण ते मुंबईदरम्यान VSR एव्हिएशनची Learjet 45 विमानाचे उड्डाण होते. परंतु, मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने लॅण्डिंग करताना हे विमान धावपट्टी २७ वरून घसरले. विमान घसरल्याने विमानाला आगही लागली. दरम्यान, या दुर्घटनेनंतरही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते. मुसळधार पावसाने दृश्यमानता ७०० मीटर होती” अशी माहिती विमान वाहतूक नियामक DGCA ने दिली. व्हीएसआर एव्हिएशन ही नवी दिल्लीस्थित कंपनी आहे. ही कपंनी कॉर्पोरेट प्रवासी आणि इतरांना सुरक्षित आणि परवडणारे विमान प्रवासाची सुविधा पुरवते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Private jet with 8 onboard skids off runway at mumbai airport first visuals surface sgk

First published on: 14-09-2023 at 18:38 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×