राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटनात एकमेकांवर राजकीय टीका

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

मुंबई : राज्यपालांच्या कार्यपद्धतीबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार टीकाटिप्पणी केली जात असतानाच गेल्या अडीच वर्षांत आपण राजभवनला लोकभवन बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावा करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगाविला, तर विरोधी पक्षात असताना आम्ही वर्षांतून एक दोनदाच राजभवनावर येत असे. आजच्यासारखे रोज रोज येत नव्हतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपला कानपिचक्या दिल्या. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला.

राजभवन येथे नूतनीकरण करण्यात  आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल अनुक्रमे राम नाईक, डॉ. डी. वाय. पाटील व पद्मनाभ आचार्य आदी उपस्थित होते. लोकशाही प्रणालीमध्ये राजभवन हे जनसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये दरबारह्ण हे सार्वजनिक जीवनातील पारदर्शिकतेचा पुरस्कार करतात. आजच्या संदर्भात ‘दरबार हॉल’ हे लोकशाहीचे नवे प्रतीक झाले असून राजभवन हे लोक कल्याणकारी उपक्रमांचे केंद्र होईल,  असा आशावाद राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केला.

दरबार हॉलच्या उद्घाटनानिमित्त राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना महाराष्ट्राच्या महानतेला विविध आयाम असल्याचे राष्ट्रपतींनी  सांगितले. संतांची, वीरांची व समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र हे देशातील प्रमुख आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.  राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ हेडगेवार यांचा कार्याचे स्मरण केले. दिवंगत पाश्र्वगायिका लता मंगेशकर यांचे संगीत अमर असल्याचेही त्यांनी सांगितले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण राजभवनाला लोकभवन बनवण्याचा प्रयत्न केला, असे सांगतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यकाळात केलेल्या कामांची जंत्रीच वाचून दाखविली. 

करोना काळात अधिकाधिक योगदान द्यावे या दृष्टीने आपण कुलपती या नात्याने विद्यापीठांना सूचना केल्या, आदिवासी कातकरी समाजातील अंदाजे २३हजार लोकांना हक्काची घरे / जमीन देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगताना राजभवन येथील भूमिगत तळघरात (बंकर) स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतिकारकांची गॅलरी लवकरच सुरु करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. देशभरातील राजभवनांतील दरबार हॉलचे नाव बदलून त्यांना संतांची नावे देण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना  नुतनीकरण करण्यात आलेल्या   दरबार   हॉलला समर्थ सभागृहह्ण असे नाव देणे योग्य ठरेल, असे मत कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आठवणींनाउजाळा 

 सध्या राज्यातील राजकीय हवा काहींसी गरम असली तरी राजभवनावरील हवा मात्र थंड असते, असो टोला लगावत आधुनिकता अंगी बाळगत  संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासाठी सज्ज झाली आहे. या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन असून अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही. या राजभवनात आपण शिवसेनाप्रमुखांसोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांना तसेच अनेक राज्यपालांना भेटल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. राजभवनाच्या जुन्या दरबार हॉलचा वारसा जपून त्याचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. राजभवनाने पारतंत्र्यातील काळ पाहिला तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.