मुंबई : पत्नीच्या पाकिस्तानातील कुटुंबीयांनी तिला आणि आपल्या दोन अल्पवयीन मुलांना बेकायदा ताब्यात ठेवल्याचा दावा चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला यांनी केला आहे. कुटुंबीयांना पाकिस्तानातून सुरक्षित आणण्याचे आदेश भारत सरकारला देण्याच्या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. 

 न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावली व प्रकरणाची सुनावणी २९ ऑगस्ट रोजी ठेवली.  नाडियादवाला यांनी  ही याचिका केली आहे. पत्नीच्या कुटुंबीयांनी तिच्यासह  नऊ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीला पाकिस्तानात ताब्यात ठेवले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.