scorecardresearch

प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांना डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार

डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार यंदा प्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ आणि अनुवादक प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांना जाहीर झाला आहे.

प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांना डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार
प्रा. अब्दुस सत्तार दळवी

मुंबई : डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार यंदा प्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ आणि अनुवादक प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांना जाहीर झाला आहे. प्रा. अब्दुस सत्तार दळवी हे मुंबई विद्यापीठातील उर्दू विभागाचे संस्थापक आहेत.

‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अ‍ॅण्ड सेक्युलॅरिझम’, ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ दाऊदी बोहरा कम्युनिटी’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इस्लामिक स्टडीज’ आणि ‘बोहरा यूथ संस्थान’ या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. २०२१च्या पुरस्कारासाठी प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांची निवड करण्यात आली. १८ ऑगस्टला मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथील जे. पी. नाईक भवन येथे दुपारी ४ ते ५.३० या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्रा. अब्दुस सत्तार दळवी हे १९८२ ते १९९७ या काळात मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.