scorecardresearch

आरोपी पोलिसांना ओळखण्यात अंगडिया व्यावसायिक अपयशी

डांबून ठेवून रक्कम स्वीकारल्याचा आरोप असलेल्या तीन पोलिसांना ओळखण्यात अंगडिया अपयशी ठरले आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : डांबून ठेवून रक्कम स्वीकारल्याचा आरोप असलेल्या तीन पोलिसांना ओळखण्यात अंगडिया अपयशी ठरले आहेत. आर्थर रोड तुरुंगात झालेल्या ओळख परेडमध्ये कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेतले ते अंगडिया व्यवसायिकांना सांगता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपी पोलिसांविरोधात एक हजारपेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र शनिवारी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीही यांचा त्यांत समावेश आहे.

आर्थर रोड तुरुंगात या महिन्याच्या सुरुवातीला ही ओळख परेड झाली होती. त्या वेळी अंगडिया व्यवसायिकांना तेथे उभ्या असलेल्या अनेक व्यक्तींपैकी तीन आरोपी पोलिसांना ओळखण्यास सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडून पैसे घेतले नसल्याचे अंगडिया व्यावसायिकांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Professional fails identify accused police alleged acceptance amount ysh

ताज्या बातम्या