प्रोजेक्ट मुंबई आयोजित ‘झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळा २०२५’ (Zero Waste Schools Sustainability Mela 2025) शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. ‘होप इन अॅक्शन: युथ फॉर ए क्लायमेट-रेझिलिएण्ट मुंबई’ (Hope in Action: Youth for a Climate-Resilient Mumbai) या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात ३० हून अधिक शाळा, शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आगामी ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’ ची नांदी ठरलेल्या या महोत्सवाने शाश्वत परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास शहराचे चित्र पालटू शकते, हा संदेश दिला.
दिग्गजांच्या उपस्थिती सोहळ्याची सुरुवात
दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात झिरो वेस्ट स्कूल्स फिल्मच्या स्क्रीनिंगने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे मिशन संचालक सुधाकर बोबडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व सीईओ शिशिर जोशी, चिल्ड्रन्स अकॅडमीचे रोनित भट आणि मरिन बायोलॉजिस्ट कोणार्क बोरकर उपस्थित होते. बोबडे यांनी हवामान बदलाला प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, तर शिशिर जोशी यांनी नागरिक आणि विद्यार्थी केंद्रित हवामान कृतींचे महत्त्व अधोरेखित केले.
मेळाव्याचं खास आकर्षण काय ठरलं?
कार्यशाळा आणि प्रदर्शने या मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष कृतीवर आधारित कार्यशाळा. यामध्ये ‘सस्टेनेबल गिफ्ट रॅपिंग’, ‘ग्रीन रीडिंग’ आणि ‘प्लास्टिक-फ्री डेकोर’ यांसारख्या विषयांवर सत्रे पार पडली. विद्यार्थ्यांनी उभारलेले १० हून अधिक परस्परसंवादी शाश्वतता गेम स्टॉल्स, चक्रिय अर्थव्यवस्था आणि एनजीओ बूथ्स लक्षवेधी ठरले. प्रोजेक्ट मुंबईच्या स्टॉल्सवर कंपोस्टिंग, रिसायकलिंग आणि अपसायकलिंगची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
अभिनेत्री दिया मिर्झाची प्रमुख उपस्थिती
दिया मिर्झा यांचा तरुणाईशी संवाद कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या यूएन एन्व्हायर्नमेंट गुडविल अॅम्बेसेडर आणि अभिनेत्री दिया मिर्झा. त्यांनी टाऊनहॉल-स्टाईल चर्चासत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तरुण हे केवळ उद्याचेच नव्हे, तर आजचेही नेते आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, दुपारच्या सत्रात युनिसेफ इंडियाचे युसुफ कबीर यांनी ‘वॉश’ (WASH) आणि हवामान अनुकूलन यावर मार्गदर्शन केले. तसेच, तरुण पर्यावरणवादी राहुल बागवे यांच्या सूत्रसंचालनाखाली विद्यार्थी पॅनेल चर्चासत्रही पार पडले.

शाळा आणि शिक्षकांचा गौरव यावेळी आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘झिरो वेस्ट स्कूल्स प्रोग्राम’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९ ‘लेव्हल-२’ शाळा, २० ‘लेव्हल-१’ शाळा आणि २० फॅसिलिटेटर्सना सन्मानित करण्यात आले. कंपोस्टिंग, कचरा विलगीकरण आणि प्लास्टिक पुनर्वापरात या शाळांनी आदर्श निर्माण केला आहे. चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन मुंबईला ‘क्लायमेट-रेझिलिएण्ट’ बनवण्याच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट मुंबईने सर्वांना आवाहन केले आहे. स्वयंसेवक किंवा सहयोगी म्हणून सहभागी होण्यासाठी info@projectmumbai.org या ईमेलवर किंवा ९६५३३ ३०७१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
