मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून गृहविभागाकडून आदेश जारी करून राज्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली.

करोनामुळे राज्यातील पोलीस दलातील अनेक बदल्या व बढत्या रखडल्या होत्या. त्याला अखेर गुरूवारी मुहूर्त मिळाला असून राज्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील दत्तात्रय शिंदे, श्रीनिवास पन्हाळे, सुर्यकांत बांगर, नितीन बोबडे, रवी सरदेसाई, धरणेंद्र कांबळे, सावळाराम आगवणे, श्रीराम कोरगावकर, दिवाकर शेळके, शशिकांत माने, जगदेव कालापाड, मृत्यूंजय हिरेमठ, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, संजय जगताप, हरीष गोस्वामी, दीपक निकम, किशोर गायके, सुहास हेमाडे, जयंत परदेशी, सुधीर कार्लेकर, दिनकर शिलवते, शरद ओहोळ, मुरलीधर कारकर, विठ्ठल शिंदे, नामदेव शिंदे, बाबासाहेब साळुंखे, शक्तीप्रसाद थोरात यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलातच नवा पदभार देण्यात आला आहे.

traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Pune police, robbed, citizens, Gulf countries, gang, from Delhi, pretending, policemen,
पुणे : अरबी भाषेत संवाद साधून आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड
Uddhav Thackeray criticized PM Modi
शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात