२८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती

भाजप सरकारच्या काळात म्हणजे ऑक्टोबर, २०१५मध्ये मंडळावर २१ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

‘राज्य मराठी विकास संस्थे’चे नियामक मंडळ

मुंबई : मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या नियामक मंडळावर २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षांसाठी हे सदस्य कार्यरत राहतील.

भाजप सरकारच्या काळात म्हणजे ऑक्टोबर, २०१५मध्ये मंडळावर २१ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सदस्यांचा कालावधी तीन वर्षांनी संपुष्टात आल्यानंतर नवीन सदस्यांची नियुक्ती के ली न गेल्याने हेच सदस्य नियामक मंडळाचे काम पाहत होते. आधीच्या मंडळावरील जागतिक मराठी परिषदेच्या प्रतिनिधी रेखा दिघे आणि बृहन्महाराष्ट्र परिषदेचे प्रतिनिधी शिवाजीराव भोसले वगळता सर्व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे सदस्य…

यात साहित्य क्षेत्राशी संबंधित डॉ. मिलिंद आगाशे, वसंत आबाजी डहाके , सिसिलिआ काव्र्हालो, ना. धों. महानोर, अविनाश कोल्हे यांच्यासह सुशांत नाईक, अच्युत गोडबोले, शोभा नाईक, हेरंब कु लकर्णी, संजय डहाळे, प्रा. प्रमोद मुनघाटे, सुनील वेलणकर, डॉ. भालचंद्र शिंदे, नमिता कौर, डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. गुरुनाथ पंडित, प्रशांत गिरबाने, सुदेश भोसले, शफाअत खान, प्रा. रावसाहेब काळे, डॉ. सतीश बडवे, डॉ. मधुकर वाकोडे, नारायण कापोलकर यांची उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, मराठी संस्था, रंगभूमी, शिक्षण, मराठी भाषा अध्यापन, रंगभूमी, प्रसारमाध्यम, कृषी आदी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे अध्यक्षही मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Promotion of marathi language and literature working for dissemination rajya marathi vikas sanstha appointment of members akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही