मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही मालमत्ता करात सूट दिली जाणार आहे. शहरात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करातील सामान्य कर माफ करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. सरकारच्या या निर्णयाचा १६ लाख मुंबईकरांना लाभ होणार असून पालिका निवडणुकीत याचा राजकीय लाभ शिवसेनेला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील अन्य महापालिकांमध्येही मालमत्ता करात सूट देण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू आहे. नवी मुंबई महापालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. मात्र तेथेही सत्तांतर घडवून आणण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न असून नवी मुंबईतही मालमत्ता करात सूट दिली जाईल, असे जाहीर केले आहे. तर ठाणे महापालिकेने यापूर्वीच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
akola, Senior Civil Court, Defamation Suit, Dismisses, Intak Leader, bjp and shinde group, mla,
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ

ठाणे महापालिकेस सध्या मालमत्ता करापोटी वार्षिक ५०० ते ६०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र ५०० चौरस फुटांपर्यंत किती मालमत्ता आहेत, याचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही. मात्र करमाफी दिल्यास १०० ते १५० कोटी रुपयांचा महसूल कमी होण्याची शक्यता पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे.