कांदिवली येथील एका निवासी इमारतीमधील बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील सुमारे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी चारकोप पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई : उघड्या मॅनहोलची समस्या, अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार, उच्च न्यायालयाचा इशारा

कांदिवलीच्या चारकोप परिसरातील ‘ज्योती’ अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील सदनिकेत नंदन गजपती राव (६१) कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होते. गेल्या महिन्यापासून ते पुण्याला आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. त्याच फायदा घेऊन ४ डिसेंबर रोजी पहाटे ५-६ च्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तीन तरुण आत शिरले. त्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील १४ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून पलायन केले. त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या भांड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- हार्बरची धाव लवकरच बोरिवलीपर्यंत; भूसंपादन प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर

राव यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मोबाइलवर पाहिले आणि ४ डिसेंबर रोजी पहाटे घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ते पुण्यातून मुंबईत आले आणि त्यांनी चारकोप पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. त्यांनी पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण दिले असून त्यात तीन तरुण चेहऱ्यावर मुखपट्टी बांधून त्यांच्या घरात शिरल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Property worth 14 lakhs was looted by burglarizing a house in kandivali mumbai print news dpj
First published on: 07-12-2022 at 16:40 IST