मुंबईतला अत्यंत सुसंस्कृत भाग असलेल्या गिरगावातून मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. यातली एक अभिनेत्री ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तर दुसरी अभिनेत्री ही बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून झळकली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका दलालाला रंगेहाथ पकडलं आहे. हा दलाल सेलिब्रिटींसह काम करणारा मेकअप आर्टिस्ट आहे अशीही माहिती पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे.
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या एका कथित हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कारवाईनंतर धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या छाप्यादरम्यान, दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. ज्यात एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा आणि बंगाली चित्रपटसृष्टी, बॉलिवूडमधील छोट्या भूमिकांशी संबंधित असलेल्या दुसऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान, एका संशयित दलालाला अटक करण्यात आली, जो कथितरित्या सेलिब्रिटींशी संबंधित एक मेकअप आर्टिस्ट आहे. पोलीस आता आर्थिक व्यवहारांच्या व्यवहारांचा तपास करत आहेत, यात सामील असलेल्यांची चौकशी करत आहेत आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या संभाव्य भूमिकेची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
- मुंबईतल्या गिरगावात एका हॉटेलवर छापा टाकून देह व्यापाराचं रॅकेट आम्ही उद्ध्वस्त केलं.
- या सेक्स रॅकेटमध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची आणि एका बंगाली तसंच बॉलिवूड अभिनेत्रीची सुटका केली.
- ज्या मराठी अभिनेत्रीला सोडवलं गेलंय तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये काम केलं आहे.
- बंगाली अभिनेत्री ही बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि कॅमिओसाठी ओळखली जाते.
- कारवाईच्या दरम्यान एका दलालाला अटक करण्यात आली आहे.
- पोलिसांनी सुटका करण्यात आलेली कुठल्याही महिलेची ओळख उघड केलेली नाही.
या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या सर्व महिलांना देह व्यापार करण्यास भाग पाडलं जात होतं आणि ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळली जात होती. छापा टाकण्यापूर्वी या बेकायदेशीर कृत्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवलं होतं. आणि त्यानंतर छापा टाकत महिलांची सुटका केली. ज्या दलालाला पोलिसांनी अटक केली आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही महिला अडकल्या आहेत का? याचाही शोध घेतला जातो आहे. पोलिसांनी हे सांगितलं की ज्या पीडिता आहेत त्यांना हॉटेलवर बोलवलं जायचं का? धमकावलं जात होतं का? देह व्यापार करायला भाग पाडलं जात होतं का? याचीही माहिती घेतली जाते आहे. या प्रकरणाचे इतर तपशील जसं की आरोपीवर कुठल्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला, कुठली कलमं लावण्यात आली हे समजणं बाकी आहे.
