scorecardresearch

सलग सातव्या रविवारी आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलन

पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रध्वज फडकवत आरे कारशेडविरोधात घोषणाबाजी केली.

सलग सातव्या रविवारी आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलन
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : आरे वसाहतीमध्ये होऊ घातलेल्या कारशेडला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सलग सातव्या रविवारी आंदोलन केले. पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रध्वज फडकवत आरे कारशेडविरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी आरे वसाहतीत बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणारी कारशेड अन्यत्र हलविण्याच्या मागणीसाठी  सात रविवारपासून येथे पर्यावरणप्रेमी आंदोलन करीत आहेत. आरेमधील कारशेड आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यात येत आहे. तेथील पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असा दावा आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.