टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील केंद्रामध्ये कर्करोग रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षीत प्रोटॉन बीम उपचार पद्धतीद्वारे पुढील आठवड्यापासून उपचार करण्यात येणार आहेत. परदेशात या उपचार पद्धतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येत असून येथे या उपचार पद्धतीने माफक दरामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रोटॉन बीम उपचार पद्धतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेमध्ये उद्घाटन करण्यात आले होते. ही सुविधा पुरविणारे टाटा रुग्णालय हे देशातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरले आहे.

हेही वाचा >>> नालेसफाईवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह; आयुक्त, अभियंते, कंत्राटदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
mumbai, J J Hospital, ART Center, HIV AIDS Treatment, Celebrate 20 Years, 43 thousand, Patients Treated,
जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित

आजघडीला टाटा रुग्णालयामध्ये येणाऱ्या कर्करोग रुग्णांवर रेडिएशन उपचार पद्धतीने उपचार केले जातात. मात्र यामुळे कर्करोगाच्या पेशींबरोबरच अन्य पेशीसुद्धा नष्ट होतात. मात्र प्रोटॉन उपचार पद्धतीमुळे फक्त कर्करोगाच्याच पेशी नष्ट होतात. प्रोटॉन उपचार पद्धती ही अद्ययावत उपचार पद्धत म्हणून ओळखली जाते. प्रोटॉन उपचार पद्धतीमध्ये लहान मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे, तर ४० टक्के वयस्कर नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत. दरवर्षी साधारणपणे ८०० रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गरीब रुग्णांवर निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत. प्रोटॉन उपचार पद्धतीचे उपचार करण्यासाठी केंद्रामध्ये तीन बीम कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एका वेळी तीन रुग्णांवर प्रोटॉन उपचार पद्धतीने उपचार करणे शक्य होणार आहे. एका बीम कॅमेऱ्याची किंमत ३० ते ४० कोटी रुपये आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेश बडवे यांनी दिली.

अवघ्या २० मिनिटात होणार उपचार

प्रोटोन उपचार पद्धतीमध्ये एका रुग्णावर उपचारासाठी किमान २० मिनिटे लागण्याची शक्यता आहे. मात्र एका रुग्णाला रेडिएशन बीम फक्त दोन मिनिटे दिले जाणार आहे. मात्र बीम कोणत्या दिशेने द्यायचे हे ठरविण्यासाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटे लागणार आहेत. पहिल्या रुग्णावर उपचार सुरू केल्यानंतरच दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी तयार करता येणार आहे.

ऑनलाईन पाहता येणार प्रोटाॅन उपचार पद्धतीने करण्यात येणारा उपचार हा साधारणपणे ३० ते ४० दिवसांचा असणार आहे. ट्युमरनुसार उपचाराचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. या उपचाराने ट्युमरचा आकार किती कमी झाला याचा अहवाल डॉक्टरांना ऑनलाईन पाहता येणार आहे.