पोलीस आणि डॉक्टर हे जनतेच्या हितासाठी काम करतात असे सांगत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारचीच आहे असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. रस्त्यावर झालेल्या मारहाणीत विलास शिंदे या पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
मुंबई हायकोर्टात शुक्रवारी एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे मत मांडले आहे. निवासी डॉक्टरांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाही. या डॉक्टरांना कमी वेतन का दिले जाते, त्यांच्या निवासाची व्यवस्था काय आहे अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टाने राज्य सरकारवर केली आहे. डॉक्टर आणि पोलीस यांना लक्ष्य करणे सर्वसामान्यांसाठी सोपे झाले आहे अशी खंतही हायकोर्टाने व्यक्त केली.