मुंबई : सेवाव्रतींना बळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला दानशूरांनी यंदाही उदंड प्रतिसाद दिला आहे. या दानयज्ञात दात्यांनी भरभरून दान टाकले असून ते सेवाव्रतींच्या हाती सोपवण्यासाठी या उपक्रमाचा सांगता सोहळा सोमवारी, २९ जानेवारी रोजी ठाणे (पश्चिम) परिसरातील घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची वाचकांना ओळख करून देत त्या संस्थांच्या पुढील कार्यासाठी दानयज्ञ खुला करून देणारा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा ‘लोकसत्ता’च्या विविध लोकोपयोगी उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. गेल्यावर्षी तपपूर्तीची वाटचाल पूर्ण करून पुढे निघालेल्या दातृत्वाच्या या सोहळय़ाला दात्यांचा मिळणारा पािठबा कायम आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती वाचकांना गेल्या वर्षी करून देण्यात आली होती. यंदाही वाचक-देणगीदारांनी मदतीचा हात देत या सर्व संस्थांच्या कार्याला पाठबळ दिले आहे. या दानयज्ञाची सांगता शनिवारी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात या संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. आनंद नाडकर्णी ‘देण्यातले घेणे’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

archana patil have large amounts of gold
अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार
Sunetra Pawar gave a loan of 50 lakhs to Pratibha Pawar and 35 lakhs to Supriya Sule
सुनेत्रा पवारांनी प्रतिभा पवारांना ५० लाख तर, सुप्रिया सुळे यांना दिले ३५ लाखांचे कर्ज
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Demonstrations by Bhavna Gawli supporters
‘अखेरपर्यंत खिंड लढू’, भावना गवळी समर्थकांची निदर्शने

हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठातर्फे ११० दिवसांनंतर विधी शाखेचा निकाल जाहीर; विधी शाखा तृतीय सत्र परीक्षेत ५७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

यावर्षी या उपक्रमात ‘दृष्टी आर्चरी अकॅडमी’, ‘नंददीप फाउंडेशन, यवतमाळ’, ‘आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन’, ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था’, ‘पाठबळ सामाजिक विकास संस्था’, ‘तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था’, ‘आरोहन’, ‘पेटॅनिटी अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल रिहॅबिलिटेटर्स फाउंडेशन, चंद्रपूर’, ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ आणि ‘गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन’ या संस्थांची माहिती देण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा प्रतिसाद देत दानशूरांनी या संस्थांचे हात बळकट केले आहेत. दि कॉसमॉस बँक को. ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या सहकार्याने दिलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेलाही मोठा प्रतिसाद मिळाला.