लोकसत्ता दुर्गांच्या ‘कॉफी टेबल बुक’चे आज पुण्यात प्रकाशन

सामाजिक अंतराचे नियम पाळून होणारा हा छोटेखानी कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

मुंबई : अनेक अडचणी पार करत यश मिळवणाऱ्या आणि बरोबरीनेच समाजाच्या विकासाचा वसा घेतलेल्या ६३ कर्तबगार ‘लोकसत्ता दुर्गां’चे कार्यकर्तृत्व आता ‘कॉफी टेबल बुक’च्या स्वरूपात संकलित करण्यात आले आहे.  गुरुवारी, १९ ऑगस्ट रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आणि पुस्तकाच्या प्रमुख पुरस्कर्त्यां ‘ग्रॅव्हिटस फाऊंडेशन’च्या उषा काकडे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

२०१४ ते २०२० या ७ वर्षांतील  ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कारार्थींच्या कामाची ही माहिती एकत्रितपणे प्रकाशित करण्यासाठी पुण्यातील ‘ग्रॅव्हिटस फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर रोहिणी हट्टंगडी यांच्याशी अनिता दाते संवाद साधणार असून त्यातून हट्टंगडी यांच्या अभिनय कारकीर्दीचे विविध पैलू उलगडणार आहेत.

सामाजिक अंतराचे नियम पाळून होणारा हा छोटेखानी कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Publication of loksatta durga coffee table book in pune today akp

ताज्या बातम्या