मुंबई : आरोग्यदायी आणि तितक्याच चविष्ट पाककृतींनी परिपूर्ण ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे येत्या बुधवारी, दिनांक १८ जानेवारी रोजी ठाणे येथे प्रकाशन होणार आहे. यानिमित्ताने घरोघरच्या केवळ सुगरणींसाठीच नाही तर सर्वासाठी खुल्या पाककृती स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
आयुर्वेदिक आहार, पौष्टिक भरडधान्यांच्या वैशिष्टय़पूर्ण पाककृती आणि रानभाज्यांच्या पाककृतींचा खजिनाच यंदाच्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकात वाचकांना मिळणार आहे. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाणे येथील ‘हॉटेल टिप टॉप प्लाझा’ येथे या अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या प्रकाशनाच्या निमित्ताने याच ठिकाणी होणाऱ्या पाककला स्पर्धेसाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘रत्नमाला’ची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ तसेच सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार उपस्थित राहणार असून ते स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षणही करणार आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पौष्टिक व आरोग्यदायी असा कोणताही एकच पदार्थ स्वत: तयार करून आणायचा आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कार्यक्रमापूर्वी तिथेच नोंदणी करता येईल. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना निवेदिता सराफ आणि वरुण इनामदार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच या वेळी त्यांच्याशी भरपूर टिप्स देणाऱ्या खाद्यविषयक गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
टायटल पार्टनर : पितांबरी रुचियाना फूड डिव्हिजन
सहप्रायोजक : अंजुमन- ए – इस्लाम, मेसर्स बी.जी.चितळे डेअरी आणि श्री धूतपापेश्वर लिमिटेड
पॉवर्ड बाय : केसरी टुर्स, ब्रह्मविद्या साधक संघ आणि व्ही.पी.बेडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड
कधी : बुधवार, १८ जानेवारी २०२३
केव्हा: संध्याकाळी ६ वाजता
कुठे : हॉटेल टिप टॉप प्लाझा, ठाणे</strong>