Premium

म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत, ५९ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीत होणार सहभागी

सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती.

Pune, MHADA, lottery, 5th December, houses
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत, ५९ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीत होणार सहभागी

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांच्या विक्रीसाठी २४ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुणे मंडळाने सोडतीची नवी तारीख जाहीर केली असून आता ५ डिसेंबर रोजी पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अंदाजे ५९ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… गोरेगावमधील अनधिकृत ‘व्यावसायिक’ सदस्यांच्या स्वतंत्र सोसायट्यांबाबत ‘म्हाडा’चेही मौन

हेही वाचा… मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ३४ टक्के अतिरिक्त पोलीस; मुंबई वाहतूक पोलिसांकडे ३४ टक्के जागा रिक्त

पुणे मंडळ क्षेत्रातील ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झाले आहेत. यातील अंदाजे ५९ अर्जदार पात्र ठरले आहेत. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा लांबली आहे. पण आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. आता ५ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत काढण्याचे नियोजन असून यासाठी अजित पवार यांची वेळ घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune mhada have lottery on 5th december for 5863 houses mumbai print news asj

First published on: 29-11-2023 at 16:48 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा