Mumbai Pune Car Truck Accident: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये तीनजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. कारमध्ये बसलेल्या तीनजणांचा यात मृत्यू झाला असून अद्याप या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (MH04 JM 5348) ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारनं मागच्या दिशेनं जोरात धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात अत्यंत भीषण असल्याने यात कारच्या बॉनेटसह पुढील भागाचा चुराडा झाला. कारची अवस्था इतकी वाईट होती की कारचा पत्रा कटरने कापून आतील मृतदेह बाहेर काढावे लागले.

dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
mumbai monorail latest news in marathi, monorail marathi news
मुंबई : मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक
Nashik Road Railway Station, Fire broke out, Cargo Coach, Godan Express, No Casualtie,
VIDEO: नाशिक रोड स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग

या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरगाव पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.