Pune Breaking News Updates: राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अद्याप ही राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे फरार आहेत. शशांक, करिष्मा आणि लता यांना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे आणि परिसर तसंच नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 21 may 2025
स्त्री चुकीच्या समजुतींवर लैंगिक संबंध प्रस्थापित करत नाही; सत्र न्यायालयाचे निरीक्षण, बलात्कार प्रकरणातून अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाची निर्दोष सुटका
युरोपमध्ये काम करणाऱ्या अनिवासी भारतीय शास्त्रज्ञावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप ठाण्यातील २७ वर्षांच्या तरूणीने केला होता. ...अधिक वाचा
पुण्यात वाहतूक शाखेतील ३० ‘ड्युटी’ अंमलदारांच्या बदल्या
वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्याची जबाबदारी ‘ड्युटी’ अंमलदारांवर सोपविण्यात आली होती. त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर एकाच वेळी तीस जणांच्या बदल्या करण्यात आल्या. ...वाचा सविस्तर
सदैव जागरूकता हाच दहशतवादावर उपाय
नुकताच झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्याला दिलेले प्रत्युत्तर याने दहशतवाद ही समस्या किती गंभीर आहे, याची जाणीव सर्वांना पुन्हा एकदा झाली. ...सविस्तर बातमी
टेकड्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या टेकडीवर फिरायला गेलेल्या युवकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी चोरांनी लुटली. टेकड्यांंवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...अधिक वाचा
कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार आई जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
उद्योगांची ‘वीजकोंडी’, चाकणसह पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना मोठा फटका
या पार्श्वभूमीवर चाकणमधील उद्योजक आणि पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. वीज प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण निरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुका येथे डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली. ...सविस्तर वाचा
अकरावीला इनहाऊस कोट्यातून प्रवेश घ्यायचाय? जाणून घ्या बदललेल्या नियमाबाबत
या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला संस्थाचालकांकडून विरोध करण्यात येत असून, या नियमामुळे राज्यभर अडचणी येणार असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. ...सविस्तर बातमी
माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणातील प्रत्यक्ष बाधित १६९४ झोपडीधारकांना घरभाड्याच्या धनादेशाचे वाटप
प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना धनादेशाचे वाटप सुरू झाले असून लवकरच त्यांची घरे रिकामी करून घेण्याच्या कामाला सुरुवात होईल. ...सविस्तर वाचा
जिंदाल पॉलीफिल्म्सची आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न; अग्निशमनच्या १२ बंबांची मदत, दोन कामगार जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी तालुक्यात जिंदाल पॉलीफिल्म्स लिमिटेड हा प्रकल्प आहे. बीओपीपी आणि पीईटीसह विविध फिल्म्सचे उत्पादन या ठिकाणी होते. ...सविस्तर वाचा
अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालक-मालकांची निदर्शने
ई-बाईक टॅक्सी आणि बाईक पुलिंग सेवांना मान्यता देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बुधवारी महाराष्ट्रातील हजारो ऑटो रिक्षाचालक रस्त्यावर उतरले अंधेरी (पश्चिम) आरटीओ कार्यालयासमोर मोर्चा आणि रिक्षाचालक, मालकांनी निदर्शने केली.
...सविस्तर वाचा
आता तरी पालिकेने पवई तलावाबाबत कठोर पावले उचलावी, पर्यावरणप्रेमींची मागणी
पवई तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून, आतातरी पवई तलावाबाबत पालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहेत. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.
...सविस्तर वाचा
धक्कादायक! प्रेयसी समोरच प्रियकराने गळफास घेत संपविले जीवन
मृताचे नाव प्रितम यशवंत वाकडे (२५, रा. पिंडकेपार , ता.उमरेड) असे आहे. ...वाचा सविस्तर
शाळांचा पुनर्विकास करता आला नाही, मग मुंबई महापालिकेला ६४ झोपू योजना कशा राबवणार, रईस शेख यांची खोचक टीका
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीन मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने विविध प्राधिकरणांवर जबाबदारी सोपवली असून मुंबई महापालिकेलाही झोपू प्राधिकरणाचे अधिकार दिले आहेत. ...सविस्तर वाचा
प्रेमप्रकरणातून शहापूरमध्ये बालविवाहाचा घाट! जिल्हाप्रशासनाकडून बालविवाह रोखला
चाईल्ड लाईन वरून या लग्नाची माहीत जिल्हा प्रशासनाला मिळाली या माहितीवरून अधिकारी धनश्री साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला. ...सविस्तर वाचा
शहापुरात २० तास विद्युत पुरवठा खंडीत; नागरिक, लघु उद्योजकांचे हाल
रात्रभर वीजे अभावी आणि डासांचा त्रास सहन करत नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागली. ...वाचा सविस्तर
मुंबई विमानतळावरून सोन्यासह परदेशी चलन जप्त, तिघांना अटक
सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन कारवांमध्ये सोन्यासह परदेशी चलन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली.
...सविस्तर वाचा
पुणे: "अजित पवारांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा," वैष्णवीच्या आई- वडिलांना अश्रू अनावर, अटक करण्यात आलेल्या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी
राष्ट्रवादी पक्षाचे नेते रवींद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, वैष्णवी यांचे आई वडील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय मागितला आहे.
...सविस्तर बातमी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ट्रॅक्टरवर… काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...वाचा सविस्तर
बालविवाहाचे नियोजन 'थांबता थांबेना'; एकाच आठवड्यात तब्बल पाच… १६ वर्षीय बालिकेचा २९ वर्षीय व्यक्तीसोबत लग्न लावण्याचा होता घाट
बालविवाहाचे संकट कायम असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बालविवाह नियोजित होते. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ते रोखण्यास यश आले आहे.
...वाचा सविस्तर
सिमेंट मिक्सर टँकरची रिक्षाला धडक, महिला प्रवाशासह रिक्षाचालक जखमी
भरधाव वेगात धावणाऱ्या एका सिमेंट मिक्सर टँकरने मंगळवारी दुपारी गोवंडी परिसरात रिक्षाला धडक दिली.अपघातात रिक्षाचालक आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
...वाचा सविस्तर
अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळा, अमरावती विभागात १,८६, ४७५ प्रवेश क्षमता
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या तीन शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता १ लाख ८६ हजार ४७५ इतकी आहे ...वाचा सविस्तर
डोंबिवलीत मसाज केंद्रांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, उच्च न्यायालयातील वकिलाची डोंबिवली पोलिसांकडे तक्रार
प्रत्यक्षात या केंद्रांमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी तक्रार डोंबिवलीतील मुंबई उच्च न्यायालयातील एक वकील ॲड. मंगेश कुसुरकर यांनी वरिष्ठ आणि स्थानिक पोलीस अधिकऱ्यांकडे केली आहे. ...सविस्तर वाचा
आता ड्रोन वापरास बंदी; वाचा नेमकं कारण? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून आता…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...अधिक वाचा
नालेसफाई योग्यपद्धतीने झाली नाही तर आंदोलन करू, मनसेचा ठाणे महापालिकेला इशारा
नालेसफाईची कामे योग्यप्रकारेच सुरू असल्याचा पालिकेचा दावा ...अधिक वाचा
चिखली 'एमआयडीसी'त अग्नितांडव! लाखोंची हानी
या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यावर आधी चिखली नगरपरिषदेचे अग्निशमन दल बोलविण्यात आले. ...सविस्तर वाचा
उलवे खून प्रकरणात पतीच सूत्रधार, सहा लाखांची सुपारी देऊन पत्नीचा खून घडवला
मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यावर अलविना हीचा पती किशोरसिंग याच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले. आणि या खुनामागचे भयंकर सत्य समोर आले. ...वाचा सविस्तर
सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची घर खरेदीत कल्याणच्या ‘अंतुलें’कडून १९ लाखाची फसवणूक
आठ वर्षापासून घर खरेदीसाठी भरलेल्या पैशात घर नाहीच, पण भरणा केलेली रक्कमही परत मिळत नसल्याने या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कल्याणमधील ‘अंतुलें’ विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली. ...वाचा सविस्तर
गुजरातमध्ये पत्नीची हत्या… आरोपीला घाटकोपरमध्ये अटक…
जरातमधील अहमदाबाद येथे आरोपीने हत्या केली होती. पंतनगर पोलिसांनी आरोपीला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले. ...अधिक वाचा