लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तीव्र वळणावर रसायनाचा टँकर उलटला. रस्त्यावर रसायन पसरल्याने वाहने घसरली आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

टँकर उलटल्यानंतर त्यातून मोठय़ा प्रमाणावर रसायनाची गळती सुरू झाली. हवेशी संपर्क आल्याने रसायन मेणासारखे झाले आणि रस्ता निसरडा झाला. त्यामुळे या भागातून जाणारी वाहने घसरली. तेथून जात असलेला एक अवजड कंटेनर उलटला. सांडलेल्या रसायनामुळे द्रुतगती मार्गावर एक प्रकारचा थर तयार झाला होता. थर हाताने काढता येणे शक्य नसल्याने त्यावर माती आणि वाळू टाकण्यात आली. जेसीबी  यंत्र तसेच अन्य यंत्रांचा वापर करून द्रुतगती मार्गावर सांडलेला थर काढण्याचे काम ‘आयआरबी’तील कर्मचाऱ्यांनी सुरू केले. सकाळी १० वाजेपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली. वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली होती. 

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहने विरुद्ध दिशेने आल्याने मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. ज्या भागात रसायन सांडले होते तेथे माती आणि वाळू टाकून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सकाळी ११ नंतर मुंबईकडे जाणारी एक मार्गिका खुली करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने मुंबईकडे सोडण्यात आली. त्यामुळे लोणावळा शहरातील कोंडीही कमी झाली. दुपारी एकनंतर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मार्गिका खुल्या करण्यात आल्या.

टँकर उलटल्यानंतर महामार्ग पोलीस तसेच अन्य यंत्रणांनी तातडीने द्रुतगती मार्गावरील वाहतूक लोणावळा शहरातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविली. त्यामुळे महामार्गावर तसेच लोणावळा शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

खंडाळा ते शिलाटणे गाव तसेच द्रुतगती मार्गावर देवळे गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पहाटेपासून मदतकार्य

आयआरबीचे पथक, महामार्ग पोलीस तसेच ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेपासून मदतकार्य सुरू केले. रसायनांचा अपघातग्रस्त टँकर आणि अवजड कंटनेर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले.