Pushpa 2 Screening Stopped At Mumbai : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २ द रुल’ हा चित्रपट ५ डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाने लोकांना इतके वेड लावले आहे की, आगाऊ बुकिंगमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय केला आहे. अशात मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरमध्ये ‘पुष्पा २ द रुल’ चा शो सुरू असताना अज्ञात व्यक्तीने विषारी गॅस फवारल्याने अनेक प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे प्रक्षेपण १५ ते २० मिनिटे थांबवण्यात आले होते. मुंबई पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी, वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरची तपासणी केली.

A fire broke out at the Gabba Stadium during the Brisbane Heat vs Hobart Hurricanes match in the BBL 2024-25. The match was stopped for some time, a video of which is going viral.
BBL Stadium Fire : सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये लागली आग; अंपायर्सनी तात्काळ थांबवला सामना, VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…

काय म्हणाले प्रेक्षक?

‘पुष्पा २ द रुल’च्या शो दरम्यान घडलेल्या या प्रकाराबद्दल एएनआयशी बोलताना एक प्रेक्षक म्हणाला, “मध्यांतर झाल्याने आम्ही थिएटरबाहेर आलो होतो. पण पुन्हा आत गेल्यानंतर कोणतही काहीतर फवारल्यामुळे अनेक प्रेक्षक खोकत असल्याचे दिसले. त्यानंतर १० मिनिटे चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.”

याबाबत बोलताना आणखी एक प्रेक्षक म्हणाला, “मध्यांतरानंतर परत जाताच आम्हाला खोकला येऊ लागला. आम्ही बाथरूममध्ये जाऊन उलट्या केल्या. १०-१५ मिनिटे गॅसचा वास तसाच राहिला. दरवाजे उघडल्यानंतर वास नाहीसा झाला. त्यानंतर चित्रपट पुन्हा सुरू झाला.”

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये महिलेचा मृत्यू

४ डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुनचे चाहते ‘पुष्पा २ द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोपूर्वी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये जमले होते. यावेळी अल्लू अर्जुन तेथे पोहोचताच, चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी धडपडताना दिसले. यावेळी चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या सर्व गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला.

हे ही वाचा : “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

गुजरातमध्ये प्रेक्षकांकडून तोडफोड

गुरुवारी वडोदरा आणि जामनगरमधील मल्टिप्लेक्समध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या फर्स्ट डे फस्ट शोच्या प्रक्षेपणास उशीर झाल्याने चाहत्यांनी गोंधळ घातला. यावेळी वडोदरातील, मांजलपूर परिसरात असलेल्या मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी वेटिंग एरियाच्या बाहेर चित्रपटाचे पोस्टर्स आणि साहित्याची तोडफोड केली.

Story img Loader