‘मेट्रो ३’, ‘मेट्रो ६’च्या  कारशेडचा प्रश्न अद्याप प्रलंबित

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आजघडीला सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामांनी वेग घेतला  आहे. मात्र ‘मेट्रो २’ वगळता अन्य मेट्रो मार्गाच्या कारशेडचा मुद्दा गुलदस्त्यातच होता. पण आता ‘मेट्रो ३’ आणि ‘मेट्रो ६’ वगळता इतर सर्व मेट्रो मार्गाच्या कारशेडचा प्रश्न निकाली काढण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. मेट्रो ७, ५ आणि ९ च्या कारशेडची जागा निश्चित केल्यानंतर आता मेट्रो ४ च्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले  आहे. एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात ३५० कि.मी.हून अधिक लांबीचे मेट्रोचे जाळे उभे करीत आहे. आजघडीला सात मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. यात ‘मेट्रो २’ ( दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो २ अ’ आणि डी. एन. नगर ते मंडाले, ४२ किमी), ‘मेट्रो ३’ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ, ३३.५ किमी), ‘मेट्रो ४’ (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४, ३२.३२ किमी आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ), ‘मेट्रो ५’ (ठाणे-भिवंडी-कल्याण,२४.९० किमी), ‘मेट्रो ६’ ( स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, १५.३१ किमी), ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी, १६.४७५ किमी) आणि ‘मेट्रो ९’ (दहिसर ते मीरा भाईंदर,१३.५८१ किमी) या मार्गाचा समावेश आहे. या सर्वच मेट्रोंची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत. मात्र मेट्रो २ वगळता उर्वरित मार्गासाठी कारशेडची निश्चित होऊ शकली नव्हती. त्यामुळे एमएमआरडीएसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

आता मेट्रो ५, ७ आणि ९ च्या कारशेडच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तर ‘मेट्रो ४’साठी ठाण्यातील मोघरपाडा येथे कारशेड बांधण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. आता केवळ ‘मेट्रो ३’ आणि ‘मेट्रो ६’च्या कारशेडचा प्रश्न बाकी आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू असून या दोन्ही कारशेडचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘मेट्रो ४’च्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागेची निश्चिती झाल्यानंतर गुरुवारपासून भूसंपादन मोजणीला सुरुवात झाल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या काही मागण्या आहेत. त्या ऐकून घेतल्या असून त्यावर चर्चा सुरू आहे. पुढील १० दिवसांमध्ये मोजणीचे काम पूर्ण करून याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यायी जागेचा शोध सुरू

  • ‘मेट्रो ३’साठी आरे येथे कारशेड प्रस्तावित होती. आरे परिसरात कारशेडच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र या जागेला जोरदार विरोध झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय रद्द केला. ‘मेट्रो ६’साठी कंजूरमार्ग येथे बांधण्यात येणाऱ्या कारशेडच्या जागी ती हलविण्यात आली. मात्र भाजपने या जागेला विरोध केला, तर केंद्रासह अन्य  व्यक्तीनी कंपन्यांनी जागेवर मालकी हक्क दाखवत न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यात वेळ जात असून ‘मेट्रो ३’च्या प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे.
  • ‘ मेट्रो ३’साठी पहाडी गोरेगावच्या जागेसह अन्य दोन, तीन पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तर एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.