रक्तातून संक्रमण होण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य

एचआयव्ही दूषित रक्त ओळखता यावे यासाठी रक्ताची अधिक काटेकोरपणे चाचणी करणाऱ्या तपासणीची सोय लवकरच मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयांमधील रक्तपेढय़ांमध्ये उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत मुंबईत ही चाचणी केवळ एका सरकारी व खासगी रक्तपेढय़ांमध्येच उपलब्ध होती; परंतु मुंबईतील पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ही चाचणी अवघ्या ५० रुपयांमध्ये करून घेता येणार आहे. त्यामुळे एचआयव्ही दूषित रक्तातून सर्वसामान्य रुग्णांना त्याची बाधा होण्याचे प्रकार आता कमी होणार आहेत.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
11 thousands Nikshay Mitra adopt 19 thousands tuberculosis patients
११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध

एचआयव्ही दूषित रक्त ओळखण्याकरिता ‘थर्ड जनरेशन’ एलायझा (एंझाईम लिंक इम्युनोसोरबेंट एस्से) तपासणी मुंबईत सर्वत्र उपलब्ध आहे. एचआयव्हीची लागण होऊन एक ते तीन महिने झालेल्या एखाद्या दात्याकडून रक्त उपलब्ध झाल्यासच या तपासणीत ते रक्त एचआयव्ही दूषित असल्याचे निदान होऊ शकत होते. मात्र, एचआयव्हीची लागण होऊन त्याहून कमी दिवस झाले असतील तर त्याचे निदान या चाचणीद्वारे होत नव्हते. त्यामुळे असे दूषित रक्त रुग्णात संक्रमित होऊन त्याला एचआयव्हीची बाधा होत असे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत ७८ जणांना रक्त व लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा या रक्त घटकांच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे.

मात्र, आता १२ ते १५ दिवसांच्या ‘विंडो पीरिएड’मध्ये (ज्या काळात लक्षणे दिसून येत नाही किंवा तो निद्रिस्तावस्थेत असतो.) असलेल्या एचआयव्ही बाधित रक्तदात्याच्या रक्तातील एचआयव्हीचे विषाणू ओळखण्याची क्षमता असलेली काटेकोर चाचणी (फोर्थ जनरेशन) नवीन वर्षांपासून मुंबईतील रक्तपेढय़ांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या केवळ ‘जे.जे. महानगर’ या सरकारी व काही खासगी रक्तपेढय़ांमध्ये सुधारित एलायझा तपासणी केली जाते.

रक्त संक्रमणातून एचआयव्हीची लागण रोखण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने सुधारित एलायझा (फोर्थ जनरेशन) तपासणीची मागणी नॅकोकडे केली होती. ‘नॅको’ने या मागणीला हिरवा कंदील दाखविला असून २०१८ पासून सोसायटीशी संलग्न असलेल्या २१ रक्तपेढय़ांमध्ये ही तपासणी करता येणे शक्य होणार आहे, असे सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी शशिकला आचार्य यांनी सांगितले.

२०१८ पर्यंत चाचणी शक्य

खासगी रक्तपेढय़ांमध्ये एचआयव्हीच्या सुधारित (एलायझा फोर्थ जनरेशन) रक्त तपासणीसाठी केवळ ५० रुपये जादा आकारले जातील, असेही आचार्य यांनी नमूद केले. सोसायटीशी केईएम, शीव, नायर, कूपर, जे.जे. ही प्रमुख रुग्णालये व वाडिया, टाटा या रक्तपेढय़ा संलग्नित आहेत. २०१८ पर्यंत सोसायटीकडे सुधारित एलायझा तपासणी किट आल्यानंतर या प्रमुख रुग्णालयांत ही तपासणी करता येणे शक्य होणार आहे.

‘हेपेटायटिस सी’च्या निदानासाठीही उपयुक्त

रक्तदान शिबिरांमधून रक्त घेतल्यानंतर त्याची शुद्धता तपासण्यासाठी विविध तपासण्या केल्या जातात. सुधारित एलायझा तपासणी अतिसंवेदनशील असल्याने १२ ते १५ दिवसांच्या विंडो पीरियडमध्ये एचआयव्हीचे निदान होईल. एचआयव्हीबरोबरच ‘हेपेटायटिस सी’चे निदानही या चाचणीमुळे लवकर होते. सध्या वापरत असलेल्या एलायझा तपासणीत ‘हेपेटायटिस सी’चे निदान ४२ दिवसांच्या कालावधीत होते. मात्र सुधारित एलायझा तपासणीत २८ दिवसांत ‘हेपेटायटिस सी’चे निदान होऊ शकते.