अंबानी-अदानी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने खरेदी केलं तब्बल ४६ कोटींचं घर; वरळीतल्या ‘या’ घराबद्दल जाणून घ्या!

हे कॉम्प्लेक्स पूर्वी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे निवासस्थान म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

ज्येष्ठ गुंतवणूकदार रामदेव अग्रवाल आणि कुटुंबाने समुद्र महल प्रकल्पात ४६.२९ कोटी रुपयांची डुप्लेक्स मालमत्ता खरेदी केली असल्याची माहिती मिळत आहे. अग्रवाल हे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस (MOFSL) चे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही एक वित्तीय सेवा कंपनी आहे जी संस्थात्मक, कॉर्पोरेट, उच्च नेट वर्थ वैयक्तिक (HNI) आणि किरकोळ ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते.

रामदेव अग्रवाल, सुनीता अग्रवाल, वैभव अग्रवाल यांनी वरळी येथील समुद्र महालात १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर ४६.२९ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ३६३८ चौरस फूट चटईक्षेत्रात हे युनिट पसरलेले आहे, असे कागदपत्रांनी दाखवले आहे. मालमत्तेचा विक्रेता सुरीन नरसी निचमल मुखी आहे, असे कागदपत्रांवरून दिसून आले आहे. खरेदीदारांनी मालमत्तेसाठी २.३९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. २३ सप्टेंबर २०२१ रोजी हस्तांतरण कराराची नोंदणी करण्यात आली होती. स्थानिक दलालांनुसार १.२७ लाख रुपये प्रति चौरस फूट दराने लक्झरी अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये, मोतीलाल ओसवाल फॅमिली ट्रस्टने मुंबईत १३व्या आणि १७ व्या मजल्यावर ६,८०० चौरस फूट पसरलेले दोन डुप्लेक्स अपार्टमेंट्स १०१ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्यांचे मूल्य १.४८लाख रुपये प्रति चौरस फूट होते. करण इसराणीने १२ ऑगस्ट २०२१ रोजी मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला समुद्र महलमधील ५ व्या आणि ६ व्या मजल्यावर डुप्लेक्स (405, 406) ९.४५ लाख रुपये भाड्याने दिले होते.
समुद्र महल हे मुंबईच्या पॉश वरळी परिसरातील सुमारे पाच दशके जुने आलिशान, समुद्राभिमुख निवासी परिसर आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्वी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे निवासस्थान म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. योगायोगाने, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि मोदी दोघांनी वरच्या मजल्यावरील डुप्लेक्स युनिट व्यापले. ही एक दोन विंग, २५ मजली कॉम्प्लेक्स प्रीमियम इस्टेट आहे आणि त्यात १०० ३ BHK, डुप्लेक्स युनिट्स, अपार्टमेंट आणि दोन बंगले आहेत.

दुसरे म्हणजे, कदाचित या क्षेत्रातील हा एकमेव अपार्टमेंट ब्लॉक आहे ज्यात समुद्राचे ३६०-डिग्री दृश्य दिसते; तिसरा आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हा कदाचित दक्षिण मुंबईतील काही संकुलांपैकी एक आहे ज्याला फ्रीहोल्ड शीर्षक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raamdeo agrawal buys duplex apartment in mumbais samudra mahal for rs 46 26 crore vsk

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या