मुंबई पालिकेतील कंत्राटदार भाजपचेच

खासदार राहुल शेवाळे यांची टीका

मुंबई महापालिका (संग्रहित छायाचित्र)

खासदार राहुल शेवाळे यांची टीका

मुंबई महापालिकेतील सर्व कंत्राटदार हे भाजपचेच आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यानंतर या दोन पक्षातील नेत्यांनी एक-दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल काळी पत्रिका काढण्याचे सोमय्या यांनी जाहीर केले. त्याला शेवाळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सोमय्या यांच्या आडून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात शिवाजीनगरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सोमय्या यांच्या सह्य़ांचे पत्र आहे. १५० रुपयांऐवजी ७०० ते ८०० रुपयांना टँकर विकल्याचा प्रतिआरोप शेवाळे यांनी केला. कचरा कंत्राटदारांकडून भाजपच्या कार्यक्रमांना प्रायोजक मिळाल्याची टीकाही त्यांनी केली. या आरोप-प्रत्यारोपामुळे मुंबई पालिका निवडणुकीत रंगत आली आहे.

पालिकेतील घोटाळय़ाला मुख्यमंत्रीच जबाबदार

महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख आयुक्त असतात व त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. स्थायी समितीमधील मंजूर झालेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त व नगरविकास विभागाला आहेत. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे पालिकेतील घोटाळ्याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul shewale comment on bjp

ताज्या बातम्या