मुंबई: गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, १९१ वातानुकू लित लोकल यासह अन्य प्रकल्पांचे काम मंदगतीने सुरू असतानाही रेल्वे मंडळ अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी त्याची दखलच घेतली नसल्याचे दिसून आले.

शर्मा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. परंतु कारशेड, रेस्टॉरंट ऑन व्हील, चर्चगेट, सीएसएमटी स्थानकाची पाहणी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन दिल्लीला रवाना झाले. वातानुकू लित लोकलचे भाडेदर कसे कमी ठेवता येतील आणि प्रवासी संख्या वाढेल याबाबत मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांशी त्यांनी चर्चा के ली. मुंबईकरांच्या अन्य लोकल प्रश्नांबाबत नेमके  काय झाले याची माहितीही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही. 

शर्मा यांनी रविवारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा दौरा के ला.  मालवाहतूक आणि ती वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल असा कमी गर्दीच्या वेळी लोकल प्रवास करुन त्यांनी प्रवाशांशी संवादही साधला.  मुंबई सेन्ट्रल टर्मिनस येथेही प्रवाशांचे प्रतीक्षालय आणि अन्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयाला भेट देतानाच मुंबई सेन्ट्रल येथील युनिफाईड कमांड अ‍ॅण्ड कं ट्रोल यंत्रणेलाही भेट दिली. स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालिन परिस्थितीत अन्य यंत्रणांशी कसा संवाद साधता येईल अशा यंत्रणेची माहिती घेतल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

सोमवारी शर्मा यांनी सीएसएमटी स्थानकाची पाहणी करून त्याच्या पुनर्विकासाची माहिती घेतली. तर या स्थानकातील फलाट क्र मांक १८ येथील ‘हेरिटेज गली’लाही भेट दिली.

वातानुकू लित भाडेदराचा निर्णय अधांतरीच

अर्ध वातानुकू लित लोकल चालवण्याऐवजी भाडेदर कसे कमी करता यावर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी चर्चा के ली. परंतु त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही. तर लोकलच्या द्वितीय श्रेणीचे प्रवासी वातानुकू लित लोकलमध्ये प्रवेश के ल्यानंतर वरील भाडे हे प्रवासातच भरण्याची व्यवस्था करण्याची परवानगीही पष्टिद्धr(१५५)म रेल्वेने मागितली आहे. परंतु त्यावरही निर्णय होऊ शकला नाही. 

रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी रखडलेल्या प्रकल्पांबाबत नेमके  काय निर्णय घेतले? प्रवासी संघटनांच्या काय अपेक्षा आहेत? काहीच जाणून घेतले नाही. 

लता अरगडे, सरचिटणीस, प्रवासी एकता संस्था