मुंबई : सीएसएमटी-मडगाव मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्या प्रवास वेळेत बचत झाली आहे. ही गाडी २० सप्टेंबरपासून सुपरफास्ट म्हणून चालवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत दोन तास दहा मिनिटे वाचणार आहेत. 

गाडी क्रमांक १०११२ आणि गाडी क्रमांक १०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस ही २० सप्टेंबरपासून डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर धावत आहे. त्याच्या गाडी क्रमांकातही बदल करण्यात आला असून सुपरफास्ट झालेली कोकणकन्या एक्सप्रेस २०१११ आणि २०११२ या नव्या क्रमांकासह सेवेत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस पूर्वी मडगाव येथून दुपारी ४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नव्या बदलांसह ही गाडी मडगाव येथून सायंकाळी सात वाजता सुटून सीएसएमटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासात दोन तास १० मिनिटांची बचत झाली आहे. सीएसएमटी-मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस पूर्वीप्रमाणेच रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. पूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचत असे. आता ती सकाळी ९.४६ वाजता मडगावला पोहोचेल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.