scorecardresearch

मुंबई: उदवाहकात रेल्वे प्रवासी अडकले ; अंधेरी स्थानकातील घटना

अंधेरी रेल्वे स्थानकातील उद्वाहकामध्ये (लिफ्ट) प्रवासी अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मुंबई: उदवाहकात रेल्वे प्रवासी अडकले ; अंधेरी स्थानकातील घटना
( संग्रहित छायचित्र )

अंधेरी रेल्वे स्थानकातील उद्वाहकामध्ये (लिफ्ट) प्रवासी अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. रेल्वचा विद्युत विभाग आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे १५ प्रवाशांची वीस मिनिटांनी सुटका करण्यात आली.

अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि तीनवर उद्वाहक आहे. शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास त्यात बिघाड होऊन ते बंद झाले. त्यावेळी सुमारे १५ प्रवासी उद्वाहकात होते. अडकलेल्या प्रवाशांकडून सुटकेसाठी मदत मागण्यात येत होती. त्यांनी उद्वाहकमधील आपत्कालीन यंत्रणेचाही वापर केला. त्यावेळी उद्वाहकाबाहेर असलेल्या प्रवाशांनी ही घटना पाहताच स्टेशन मास्तर आणि अन्य यंत्रणाना याची माहिती दिली.
त्यानंतर रेल्वेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने स्थानकात येऊन प्रवाशांच्या सुटकेसाठी तात्काळ प्रयत्न केले.
उद्वाहकाच्या दुरुस्तीसाठी वीस मिनिटे लागली आणि त्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.