‘गणपतीसाठी जाताय, दागिने सांभाळा!’

रेल्वे सुरक्षा दलाचा प्रवाशांना सल्ला

रेल्वे सुरक्षा दलाचा प्रवाशांना सल्ला

गणेशोत्सवासाठी कोकणातल्या गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी यंदा मध्य रेल्वेने १८० विशेष सेवा चालवण्याची घोषणा केली आहे. या १८० सेवांमधून लाखो प्रवासी कोकणाकडे जाण्याची सुरुवात पुढल्या आठवडय़ापासून होणार आहे. प्रचंड गर्दीतून गावाला जाताना दागिने आणि मोबाइल या मौल्यवान गोष्टी सांभाळण्याचा सल्ला रेल्वे सुरक्षा दलाने दिला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या अनुभवानुसार मुंबई ते पनवेल यांदरम्यान पाच ते सहा ठिकाणे धोकादायक असून या ठिकाणी सोनसाखळी वा मोबाइल चोरीचे प्रकार सतत घडतात. रेल्वे सुरक्षा दल खबरदारी घेणार असले, तरी प्रवाशांनीही सांभाळून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल यांदरम्यान पाच ते सहा ठिकाणी चालत्या ट्रेनमधून चोऱ्या होण्याचे प्रकार घडतात. या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळातही या ठिकाणी चोऱ्यांचा संभव असतो.

 

आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी डायल १०८

मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य विभागामार्फत ‘डायल १०८’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी १०८ क्रमांक फिरविला की अत्याधुनिक रुग्णवाहिका काही मिनिटांतच पोहोचते. आतापर्यंत या क्रमांकावर रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी सुमारे एक कोटी लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. तत्काळ प्रतिसादाची ही सेवा असून १० लाख रुग्णांना जीवनदान या रुग्णवाहिकेमुळे मिळाले आहे. राज्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Railway security force advised to passengers about jewelry security