रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतरही भाडेदरातील सवलतीची प्रतीक्ष

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

मुंबई: करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे गाडय़ांना असलेला विशेष दर्जा काढून त्या नियमितपणे चालवल्या जात आहेत. यामध्ये अनारक्षित गाडय़ाही रुळावर आल्या आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत बंद आहे.

मार्च २०२० पासून करोनाची लाट सुरू होताच रेल्वे प्रवासावर निर्बंध आले.  रेल्वेगाडय़ांना गर्दी होऊ नये, यासाठी करोनात ज्येष्ठ नागरिकांची सवलत तात्पुरती बंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत सुरूच ठेवली. अशा अकरा सवलती सुरूच आहे.

करोनामध्ये बंद असलेली मेल, एक्सप्रेसमधील अनारक्षित तिकीट सेवाही नुकतीच सुरू केली. तर यात पास प्रवासाचीही मुभा दिली. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बंद असलेल्या सवलतीचा विचार होत नाही. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, याबाबत रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल. करोना पूर्णपणे गेलेला नाही. अद्यापही काही भागात निर्बंध लागू आहेत, त्यामुळे सर्व बाबींचा विचार करूनच रेल्वे मंत्रालयाकडून  निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.

’ रेल्वे मंत्रालयाकडून तिकिटांवर विविध प्रकारच्या ५१ सवलती दिल्या जातात. करोना सुरू होताच या सवलती बंद करण्यात आल्या.

’ यामध्ये दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, खेळाडू आदींचा समावेश आहे.

’ विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्यांसाठी सवलती सुरू आहेत.