मुंबई : लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील कामाला गर्डरमधील तांत्रिक कारणांमुळे विलंब होण्याची शक्यता होती. मात्र या पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. या उड्डाणपुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम येत्या मे महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.

लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरच असलेला डिलाईल रोड उड्डाणपूल धोकादायक बनल्याने त्याची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलाची पुनर्बाधणी पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेने संयुक्तरीत्या करण्याचे निश्चित करण्यात आले होते. धोकादायक बनलेला हा उड्डाणपूल वाहन आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलै २०१८ पासून बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा भाग तोडण्याचे काम टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्यात आले. या उड्डाणपुलाचा पाया उभारण्यास टाळेबंदीत सुरुवात करण्यात आली आणि २०२० मध्येच हे काम पूर्ण करण्यात आले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या, लागू झालेले निर्बंध आणि कमी मनुष्यबळामुळे पुलाच्या कामाची गती मंदावली होती.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

रेल्वे हद्दीत या पुलासाठी १६ गर्डर बसविण्यात येणार आहेत. याची चाचणी म्हणून तात्पुरते आठ गर्डर बसविण्यात आले. गर्डरची तपासणी केल्यानंतर पुन्हा नव्याने एकूण १६ गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र गर्डरच्या रचनेत उद्भवलेल्या समस्येमुळे उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणाऱ्या कामाला विलंब झाला. आता त्याला गती देण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे हद्दीत चाचणी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात आलेले आठ गर्डर हटवण्यात येणार आहेत. तेथे कायमस्वरूपी गर्डर बसवण्यात येणार असून पहिला गर्डर मे २०२२ मध्ये बसविण्यात येईल. ऑगस्ट २०२२ मध्ये रेल्वे हद्दीतील काम पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. मुंबई पालिकेनेही त्यांच्या हद्दीतील या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कामाला सुरुवात केली आहे.

वाहनचालकांना मनस्ताप

पूल नसल्याने करी रोडवरून अनेक जण वरळी नाक्यापर्यंत चालतच जातात. तर वाहनचालकांना भायखळामार्गे पूर्ण वळसा घालून जावे लागते. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड जेल मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग, करी रोड, लोअर परळ परिसरातील वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.